गेल्या 24 तासात राज्यात आढळले कोरोनाचे साडे नऊ हजार रुग्ण, 258 रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 9 हजार 518 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखांच्यावर गेली आहे.

गेल्या 24 राज्यात 9 हजार 518 रुग्ण सापडले असून 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 लाख 69 हजार 569 रुग्ण बरे झाले असून 11 हजार 854 रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात मुंबईत 1 हजार 46 रुग्ण सापडले असून 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 224 वर पोहोचली असून 5 हजार 711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे 23 हजार 828 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.