Corona Health Tips-‘ही’ पेये टाळा; शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या कोरोना झपाट्याने फैलावत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यात शरीरातील रोगप्रतिकार शक्तीचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे प्रत्येकजण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध उपाय करत आहे. काहीजण आयुर्वेदीक काढा, फळे आणि पालेभाज्यांचा वापर करत आहे. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत. मात्र, त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ नये, यासाठी काही पेयांपासून दूर राहणे गरजेचे आहे.

मद्यपानामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. मद्यपानामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे मद्यपान अनेक आजारांसाठी आमंत्रण ठरू शकते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ नये, यासाठी मद्यपानापासून दूर राहणे फायद्याचे आहे. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तसेच गॅसेस अपचनाचा त्रास होत असल्यास अनेकजण सोडा वॉटर घेतात. मात्र, सोडा वॉटर शरीरासाठी हानीकारक आहे. सोडावॉटर आतड्यांवर विपरीत परिणाम करते. तसेच यकृतावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कोरोनाचा फैलावाच्या काळात सोडा वॉटरपासून लांब राहणे हिताचे आहे.

अनेकांच्या दिवसाची सुरुवात कॉफीपासून होते. कॉफीमुळ ताजेतवाने वाटत असले तरी त्यातील कॉफीन शरीरासाठी घातक आहे. अतिप्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने भिती, चिडचिडेपणा, चिंता, अस्वस्थता वाढते. परिणामी रोगप्रतिकारशक्तीही कमी होते. तसेच डोकेदुखी आणि निद्रानाशाचा त्रासही कॉफीमुळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॉफीचा रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ नये, यासाठी योग्य प्रमाणातच कॉफीचे सेवन करावे. चहा हे हिंदु्स्थानातील सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे. चहामध्येही कॉफीनसारखे घटक असल्याने चहा घेतल्याने उत्साह वाटतो. मात्र. चहाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास शरीराच्या रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी या पेयांपासून लांब रोहणे फायद्याचे ठरणार आहे.