
गेल्या वर्षी अतिवृष्टीत देवडे चिंचवलकर वाडी येथील ब्रिजचा काही भाग वाहून गेला होता. गावात याबाबत बद्दल उलट सुलट चर्चा रंगली होती. काही जणांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता. या गैरसोयीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री अनिल परब यांच्या निधीतून 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . यामुळे येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे .
निधी उपलब्ध होण्यासाठी चिंचवलकर वाडीतील कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा करून ही वस्तुस्थिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी , बाल कल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य रजनी चिंगळे, पंचायत समिती सदस्य जया माने, दीपक बेर्डे यांच्या निदर्शनात आणून दिली . रजनी चिंगळे यांनी हा विषय उचलून धरला आणि सतत पालक मंत्री अनिल परब यांच्या कडून लवकरात लवकर निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले. मात्र कोरोनामुळे निधी उपलब्ध करून देण्यास उशीर झाला. मात्र आता पालकमंत्री अनिल परब यांनी २० लाखांचा निधी मंजूर केला आहे.
पावसाळा संपला आणि नदीचे पाणी कमी झाले की याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. यासाठी निधी देणारे पालकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत , आमदार राजन साळवी, महिला व बाल कल्याण सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य रजनी ताई चिंगळे,पंचायत समिती सदस्य जयाशेठ माने व दीपक बेर्डे या सर्वांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.


























































