
लॉकडाऊनचा गैरफायदा उचलत चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने शटर उचकटून सोनाराचे दुकान साफ केले. गुन्हा केल्यानंतर आरोपी ऍन्जॉय करण्याच्या मूडमध्ये होते. पण चेंबूर पोलिसांनी तत्काळ तपासचक्र फिरवून नागपाडा येथून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींकडून चोरलेले सोने-चांदीचे दागिने हस्तगत केले. चेंबूर येथे महेंद्र जैन यांचे सराफाचे दुकान आहे. 14 तारखेला घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने दुकानाचे शटर तोडून लुटमार केली. तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून खबऱयांचे जाळे पसरवले. तसेच तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यावर दोन आरोपी नागपाडय़ातील फारस रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने फारस रोड गाठून जाहिद याकुब मुनेजात (24) आणि त्याच्या 16 वर्षीय साथीदाराला पकडले.





























































