मानखुर्दच्या चिल्ड्रन होममधील 30 जणांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानखुर्द येथील चिल्ड्रन होममधील 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तरुणांची संख्या कमी असून 50 वयोगटानंतरच्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. यात काही गतिमंद रुग्णांचाही समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या एम/पूर्व विभागात ठिकठिकाणी सर्वेक्षण आणि फिव्हर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर, नुकतीच गोवंडी येथील चिल्ड्रन होममधील 268 जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी 30 जणांना कोरोना झाला आहे. या व्यक्ती 13 ते 70 वयोगटातील असून यात 25 पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे, अशी माहिती एम/पूर्वचे साहाय्यक आयुक्त सुधान्शू द्विवेदी यांनी दिली. दरम्यान, यातील 27 जणांना बीकेसीतील कोरोना रुग्णालयात तर तिघांना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांपैकी दोघांना टीबी असून एकाला कोरोनाची तीव्र लक्षणे आहेत.