दोन लाख 13 हजार कोरोनामुक्त; राज्यात 9431 नवीन रुग्ण, 6044 रुग्ण बरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात रविवारी 6044 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.74 टक्के असून आतापर्यत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 13 हजार 238 झाली आहे. कोरोनाच्या 9431 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 48 हजार 601 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली.

राज्यात रविवारी 267 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.63 टक्के एवढा आहे. मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-57, ठाणे-13, ठाणे मनपा-10, नवी मुंबई मनपा-8,कल्याण-डोंबिवली मनपा-9, उल्हासनगर मनपा-5, भिवंडी निजामपूर मनपा-2, मीरा-भाईंदर मनपा-1, वसई-विरार मनपा-6, रायगड-12, पनवेल मनपा-7, नाशिक-1, नाशिक मनपा-4, धुळे- 1, धुळे मनपा-1, जळगाव-13, जळगाव मनपा-2, नंदूरबार-1, पुणे-17, पुणे मनपा-28, पिंपरी-चिंचवड मनपा-10 अशी नोंद आहे.

मुंबईत दिवसभरात 1361 कोरोनामुक्त

मुंबईत रविवारी कोरोनाचे 1115 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 57 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1361 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 80 हजार 238 वर पोहोचली आहे. मुंबईत 57 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 090 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 73 टक्क्यांवर आले असून मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 22 हजार 768 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 4 लाख 78 हजार 825 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 9096 वर पोहोचली.