नगर जिल्ह्यात 97 रुग्णांची वाढ; कोरोनाबाधितांची संख्या 3544 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-virus-new-lates

नगर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी 6 वाजेपासून सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत रूग्णसंख्येत 97 ने वाढ झाली आहे. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1206 झाली आहे. सोमवारी तब्बल 340 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता 2285 झाली आहे. तर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3544 वर पोहचली आहे.

सोमवारी जिल्ह्यातील 340 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा 222, संगमनेर 31, राहाता 18, पाथर्डी 2, नगर ग्रामिण 18, श्रीरामपूर 11, कॅन्टोन्मेंट 7, नेवासा 2, श्रीगोंदा 5, पारनेर 9, अकोले 1, राहुरी 9, शेवगाव 4, कोपरगाव 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 1206 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर2285 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबिधतांची संख्या 3544 वर पोहचली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये सोमवारी दुपारपर्यंत 97 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामध्ये या विभागात रुग्ण आढळले आहेत.

  • श्रीगोंदा (8)- काष्टी (6),, बनपिंप्री (1), श्रीगोंदा (1)
  • अकोले (12)- गोडेवाडी (2), रेडी (1), मनिकोझर (9),
  • नगर (14)- नगर (1), पोलीस हेड कॉर्टर (1) सारसनगर (1), शिवाजीनगर (1), किंग रोड (1), श्रमीकनगर (1), मार्केट यार्ड कर्पे मळा (1), कानडे मळा (1),जगताप मळा (1), पाईपलाईन रोड (1), हातमपुरा (4),
  • नगर ग्रामीण(05)- अकोलनेर (1) इमामपुर (1), कामरगाव (1), चिंचोडी पाटील (2)
  • राहुरी (4) – बाभूळलोन (1),बारागाव नांदूर (3),
  • पाथर्डी (1)- पाथर्डी (1),
  • शेवगाव(2)- म्हसोबा नगर (1), आंतरवली खने (1)
  • राहाता (1)- राहाता (1),
  • संगमनेर (30)- मंगळापूर (1),जनता नगर (4), जोर्वे (4), निमगाव पेंढि(1) निमगाव टेम्भी (1), मालदाड रोड (4), सुकेवाडी (1), खंडोबा गल्ली (1), घोडकर गल्ली (1), नांदुरी (2), घुलेवाडी (3), माहुली (1), नांदूरखंदरमाळ (1), जेधे कॉलनी (2), पंचायत समिती (3),
  • भिंगार (19)- सदर बजार(1), सोनसेल गल्ली (3), पंचशील नगर (3), मोनिन गल्ली (3),
    डॉ जयस्वाल (1) नेहरू कॉलनी (6), भिंगार खालेवाडी(1), भिंगार (1)
  • पारनेर (1) – टाकळी ढोकेश्वर (1)