
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या करुणराजाने सोमवारी पुन्हा एकदा दणक्यात पुनरागमन केले. मुंबई आणि उपनगरात सोमवारी सकाळी मुसळधार पावसाचे आगमन झाले. अचानक झालेल्या या पावसामुळे मुंबईकरदेखील काही काळ सुखावला. दरम्यान, येत्या 24 तासांत मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईत आणि उपनगरात सोमवारी सकाळपासून मुसळाधार पावसाचे आगमन झाले. दुपारनंतर शांत झालेल्या करुणराजाने संध्याकाळी देखील काही ठिकाणी सतंतधार सुरु झाली होती. शहरातील काही सखल भागात आज सकाळी पाणी साचल्याचे दिसून आले होते. मुंबई प्रमाणे नवी मुंबईत देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. दरम्यान, जुलैच्या अंतिम आठवडय़ात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ातही पाऊस पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 60.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद कुलाबा वेधशाळेत करण्यात आली आहे. तर सांताक्रूझ वेधशाळेत या पावसाची नोंद 100.7 मिमी इतकी होती. तर मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार मुंबई शहरात गेल्या 24 तासांत 61.68 मिमी पाऊस पडला आहे. तर पूर्क उपनगरात 39.95 इतक्या पावसाची नोंद नोंदविण्यात आली आहे. तर पश्चिम उपनगरात 43.50 मिमी पाऊस पडला असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
आज जोरदार पावसाची शक्यता
कुलाबा वेधशाळेने दर्शविलेल्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह मध्यम स्करुपाचा पाऊस पडेल. तर अधुनमधून पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

























































