‘कॉन्टॅक्ट लेस’ रूपे क्रेटिड कार्ड बाजारात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेची उपकंपनी असलेल्या आयआरसीटीसी आणि एसबीआय बँकने एकत्र येत रेल्वे प्रकाशांना भरघोस सकलत देणाऱया ‘कॉन्टॅक्ट लेस’ रुपे क्रेडिट कार्डचे मंगळवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आले. आयआरसीटीसी वेबसाइटवर जाऊन प्रवाशांनी या कार्डद्वारे 1 एसी, 2 एसी, 3 एसी, एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि एसी चेअर कारच्या बुकिंगवर कार्डधारकांना 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तसेच ऑनलाईन व्यवहारावर शुल्क माफी असणार असून आणि 1 टक्के फ्युअल सरचार्ज देखील माफ केला जाणार आहे.