मेरी कोमचे लक्ष्य ‘ऑलिम्पिक गोल्ड’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या मेरी कोमला आता ऑलिम्पिकमध्ये दुसरे पदक मिळवायचे आहे. पुढल्या वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकण्याचे स्वप्न तिने यावेळी बघितले आहे. बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असलेली मेरी कोम यावेळी म्हणाली, बॉक्सिंग हे माझे वेड आहे. त्यामुळे कुठल्याही बाबींमुळे माझे लक्ष विचलीत झालेले नाही. मी दररोज ट्रेनिंग करते आहे. ऑलिम्पिकसाठीच्या तयारीचाच हा एक भाग आहे. त्यामुळे मी प्रतिष्ठsच्या स्पर्धेसाठी सज्ज होते असे म्हटले तरी चालेल.