मोदीजी, राजस्थानातील तमाशा थांबवा! मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ashok-gehlot

राजस्थानात भाजपने जो राजकीय तमाशा सुरू केला आहे तो थांबवा, अशा शब्दांत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला. सरकार पाडण्याच्या इर्षेने आमदारांचा बाजार भरवण्यात आला असून त्यांचे भाव गगनाला भिडले असल्याचा आरोप वरून  गेहलोत यांनी घोटाळेबाज केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा राजीनामा घेण्याची मागणीही केली.

सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे राजस्थानातील काँग्रेसचे गेहलोत सरकार गोत्यात आले आहे. राज्यपाल कलराज मिश्र यांनी 14 ऑगस्ट रोजी अधिवेशन बोलावण्याची परवानगी दिली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने आपले सर्व आमदार जयपूरहून जैसलमेरला हलकले. अशोक गेहलोत आमदारांना पोहोचवण्यासाठी जैसलमेरला गेले आहेत.

आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्लाबोल केला. राजस्थानात आमदारांचा घोडेबाजार भरला आहे. दररोज कोटी कोटींनी आमदारांचा भाव काढत आहेत. भाजपने जो राजकीय तमाशा सुरू केला आहे तो थांबवा, असे खडे बोल मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सुनावले.  नैतिकतेच्या गप्पा मारणार्‍या भाजपने अगोदर शेखावत यांचा राजीनामा घ्याका असा टोलाही गेहलोत यांनी लगाकला.

सरकारच्या कामकाजावर परिणाम नाही

काँग्रेसच्या आमदारांबरोबर सरकारचे मंत्री, स्वतः मुख्यमंत्री अशोक गेहलोतही जैसलमेरला पोहोचले आहेत. येथील सूर्यगड पॅलेस हॉटेलमध्ये सर्व आमदारांची सोय करण्यात आली आहे. सगळे सरकारच जैसलमेरला हलवण्यात आल्याची टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना अशोक गेहलोत यांनी मी जयपूर येथेच राहणार आहे. मंत्रीही जयपूरलाच राहणार आहेत. सरकारच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.