
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास मुंबईतील खासगी महाविद्यालयांनी नकार दिला आहे. कोरोनाच्या संकटात परीक्षा घेण्यास आम्ही सक्षम नाही असे असोसिएशन ऑफ नॉन-गव्हर्नमेंट कॉलेजेस इन मुंबईने (एएनजीसी) विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) कळवले आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आमची मतेही जाणून घेतली नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. यूजीसीबरोबरच असोसिएशनने हे पत्र मुख्यमंत्री उद्धक ठाकरे यांनाही पाठवले आहे.
खासगी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा वेळोवेळी आढावा घेतला जातो. सेमिस्टर परीक्षाही वेळच्या वेळी घेतल्या जातात. त्यातील गुणांच्या आधारावर अंतिम परीक्षेचा निकाल घोषित केला जाऊ शकतो असे असोसिएशनचे म्हणणे आहे. व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमांची फक्त शेवटच्या सत्राची परीक्षा बाकी आहे. त्यामुळे मागील सत्रांच्या परीक्षांतील गुण तसेच अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल जाहीर करण्याची परवानगी विद्यापीठांनी द्यावी, अशी विनंती असोसिएशनने केली आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी या परिस्थितीत नक्की काय केले पाहिजे यासंदर्भात प्राचार्यांची मतेच जाणून घेतली नाहीत असा असोसिएशनचा आरोप आहे.
सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतल्यास वर्ष काया
सप्टेंबरमध्ये परीक्षा घेणे अशव्यच असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. कारण सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतली गेली तर एकंदरीत विद्यार्थ्यांचे वर्ष काया घालवण्यासारखे आहे. सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतल्यास त्याचा परीणाम पूर्ण परीक्षा प्रक्रियेवर होईल. परीक्षा घेणे, पेपर तपासणी, निकाल आणि पुनर्मुंल्यांकनासाठी वेळ लागणार असल्याने विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे तसेच नोकरीसाठीही अडचणीचे होणार आहे असेही असोसिएशनने म्हटले आहे.
मागील सत्रांच्या परीक्षा झाल्या. 25 गुणांच्या अंतर्गत परीक्षाही झाल्या. आता फक्त अंतिम सत्राच्या परीक्षेसाठी अट्टाहास का? मागील सत्रांतील कामगिरीकरून विद्यार्थ्यांचे निकाल लावता येऊ शकतात. त्यांचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. पालक केवळ आर्थिक नाही तर मानसिक विवंचनेतही आहेत. मुलांना परीक्षेला पाठवून त्यांचा जीव धोक्यात घालण्याची त्यांची अजिबात तयारी नाही. – प्रा. डॉ. टी. ए. शिकारे, अध्यक्ष, एएनजीसी
प्राचार्यांच्या संघटनांनीही व्यक्त केली चिंता
मुंबई कॉलेज प्रिन्सिपल असोसिएशननेही सद्य परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यूजीसीने 6 जुलै रोजी जाहीर केलेली मार्गदर्शक तत्के रद्द करावीत अशी विनंतीही त्यांनी केली आहे. परीक्षा घेण्याच्या सक्तीमुळे किती विद्यार्थ्यांना पुढे मिळणार्या नोकर्यांच्या संधी गमवाव्या लागतील याचा हिशेब विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी केलेला नाही. आर्थिक विवंचनेत असलेल्या आपल्या कुटुंबाला आधार देण्यासाठी कधी एकदा लॉकडाऊन संपल्यानंतर आपण नोकरीला लागतोय याच्या प्रतिक्षेत हे विद्यार्थी असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.
का नकार?
- ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी लॅपटॉप, नोटपॅड्स, वेगकान इंटरनेट कनेक्टीव्हिटी आवश्यक असते. विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांकडे त्याची पुरेशी सुविधा नाही.
- ऑफलाइन परीक्षा घेण्यास प्रत्यक्ष हजर रहावे लागते. कोरोना संकटात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात बोलवून परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य आणि इतर कर्मचार्यांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे.
- सार्वजनिक वाहतुकीच्या मर्यादेमुळे परीक्षा केंद्रात पोहोचणेही अवघड आहे.























































