ये वक्त भी निकल जायेगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैशाली माडे, गायिका

मी लॉकडाऊन होण्यापूर्वी गावाला आले आणि इथे अडकून पडले. माझं गाक अमरावतीजकळ आहे. तिथे मोबाईलला रेंज पकडत नाही. मी मुंबईत असते तर काही वेगळे उपक्रम हातात घेता आले असतं. मोबाईलला रेंज नसल्यामुळे फेसबुक लाइव्ह, इन्स्टा लाइव्ह या गोष्टीही करता आल्या नाहीत. या काळात मी जे काही बेस्ट केलं असेल, ते म्हणजे मी सगळ्या लोकांना फोन करून त्यांची चौकशी केली. माझ्या संपर्कात जे जे आहेत, ते सुरक्षित आहेत ना, याची विचारपूस केली. आता सगळे घरी असल्याने त्यांच्याशी नीट बोलता आलं. आणि मला वाटतं या काळात हेच जास्त गरजेचं होते. इतर वेळेला सगळे कामात असतात, त्यामुळे कुणाला कुणासाठी केळ नसतो. ही वेळ एकमेकांची चौकशी करण्याची आहे. तेवढे मी घरी राहून करू शकले. गाण्याच्या रियाजात खंड पडू दिला नाही.

सध्या प्रत्येकाचा जगण्याचा लढा सुरू आहे. आर्थिक अडचणी समोर उभ्या आहेत. या स्थितीची कुठेही चर्चा झाली की, एकतर अपर क्लासची होते नाहीतर लोअर क्लासची. गोरगरीबांना अनेक संस्था मदतीचे हात पुढे करतात. पण जे आपल्यासारखे मधल्या फळीतले, मध्यमवर्गीय लोक असतात ना त्यांचे मधल्यामधे मरण असतं. त्यांना कुणी मदत करणारे नसतात किंवा ते स्वतः कुणाकडे जाऊन मदत मागू शकत नाहीत. आज कलावंत मंडळींवर ही परिस्थिती ओढवलेय. कलाकारांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं आहे. रोजची ओढाताण होतेय. काही कलाकारांनी तर भाजीपाला विकायला सुरुवात केलेय. उभरते कलाकार नैराश्येत आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडायला वेळ लागेल.  म्हणूनच मला वाटतंय की, कलाकारांचाही विचार व्हायला पाहिजे.

माझ्यापुरतं सांगायचं तर, लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी माझे एक-दोन रेकॉर्डिंगचे प्रोजेक्ट होते. पण ते रेकॉर्डिंगचे असल्याने आज ना उद्या कधीतरी वर्कआऊट होतील. माझे एप्रिल-मे महिन्यांतील बरेच शो रद्द झाले. त्यामुळे आर्थिक नुकसान झालंय. आपण काही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. शून्यातून सगळं उभे केलेय. संकट आलं की पहिला फटका आम्हा कलाकारांना बसतो. नोकरदार, सरकारीवर्ग कामाला जाऊ शकतो. आम्ही कसं जायचं… काय काम करायचं…

सोशल गॅदरिंगची परवानगी किमान एक-दीड वर्षे तरी मिळणार नाही. सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतोय, तर सोशल गॅदरिंगचा प्रश्नच मिटलाय. आमचा मुख्य स्रोत कार्यक्रम. त्याला लककर परवानगी मिळणार नाही. माणसाचं आर्थिक नुकसान झालं की मानसिक परिणाम होतो. खंबीर राहायला पाहिजे. ये वक्त भी निकल जायेगा.

लोकांनी आता हळूहळू काम करायला सुरुवात केलेय. माझ्याकडे कामाची चौकशी होऊ लागलेय. आपण इतकं गडगंज कमवलेले नाही, की वर्षभर काम नाही केलं तरी चालू शकतं. पोटासाठी काम करावं लागणारच आहे. सगळय़ा नियमांचं पालन करून मला काटतं, आस्ते कदम सुरुवात करूया.

संगीतात जादू आहे

म्युझिक इटसेल्फ इज अ थिरपी. मला सांगताना आनंद काटतो की कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढण्याची ताकद संगीतात आहे. नैराश्य असो किंका अन्य समस्या असो किंवा हेल्थ इश्यू असो… सगळ्याचा ‘स्ट्रेस’ तुमच्या डोक्यातून काढण्याची ताकद संगीतात आहे.