
सध्या पावसाने ओढ दिली असली तरी मुंबई आणि महाराष्ट्राच्या काही जिह्यांमध्ये येत्या 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने शनिवारी दिला आहे. मुंबई तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सांगली, बीड, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांसाठी हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, सांगली आणि संभाजीनगरात 5 ऑगस्टपर्यंत तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील असे हवामान खात्याने अंदाज वर्तविताना म्हटले आहे. मुसळधार ते अति मुसळधार पाऊस म्हणजे हवामान खात्याच्या मते 24 तासांत 64.3 मिमी ते 204.4 मिमी पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
























































