नातवंडांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून संशयित वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्याला कोरोना झालाय या संशयातून एका वृद्ध दाम्पत्याने विषारी द्रव्य पित आत्महत्या केल्याची घटना हैदराबादमधील पुंजागुट्टा येथे घडली. आपल्या नातवंडांना संसर्ग होऊ नये म्हणून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहले आहे.

घाम करी काम!  कुत्रे शोधणार कोरोनाचे रुग्ण

सदर दाम्पत्या त्यांचा मुलगा सून व दोन नातवंडांसोबत पुंजागुट्टा येथे राहतात. या वृद्ध दाम्पत्याला दोन दिवसांपासून ताप व सर्दीचा त्रास होत होता. त्यामुळे आपल्याला कोरोना झाल्याची भीती त्यांना वाटत होती. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला व नातवंडांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून त्यांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृ्त्यचू नोंद केली आहे.

राज्यात दिवसभरात 10,725 रुग्ण बरे, 2 लाख 66 हजार कोरोनामुक्त

 

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाच्या भीतीने आत्मत्या केल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी गेवराई तालुक्यात कोरोनाच्या भीतीने एका तरुणाने आत्महत्या केली होती. तर कोल्हापूरमधील एका आरोग्य केंद्रातच कोरोना संशयिताने गळफास घेतल्याची घटना देखील नुकतीच समोर आली आहे. गेल्या चार महिन्यांत अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे