राज्यात दिवसभरात 9 हजार 926 कोरोनामुक्त, 9 हजार 509 रुग्ण पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात रविवारी दिवसभरात एकूण 9 हजार 926 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे राज्य आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा आता 2 लाख 76 हजार 909वर पोहचला आहे. दरम्यान, आज दिवसभरात 9 हजार 509 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले असून एकूण रुग्णांची संख्या 4 लाख 41 हजार 228 वर पोहचली आहे.

आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार आज राज्यात 9 हजार 509 रुग्णांचे अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. तर आज दिवसभरात 260 जणांचा मृत्यू झाले असून आतार्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 15 हजार 576 वर पोहचली असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.

मुंबईत 1,105 नवे रुग्ण
मुंबईत आज कोरोनाचे 1,105 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 49 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 393 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 88 हजार 299 वर पोहोचली आहे. मुंबईत 49 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 444 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर आले आहे तर रुग्ण वाढीचा दरही वाढून 78 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 21 हजार 412 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 5 लाख 46 हजार 620 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 16,451 वर पोहोचली आहे.