एबी बिट्स सी! कोरोनाला हरवणार्‍या बिग बींना अमूलचा सलाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नुकतेच कोरोनाला हरवून आपल्या घरी सुखरूप परतले आहेत. यानिमित्त अमूल कंपनीने खास कार्टुन पोस्टर तयार केले आहे. यात ‘एबी बिट्स सी’ असे म्हटले असून अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली हे याद्वारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, अमूलने तयार केलेले हे क्रिएटिव्ह पोस्टर बिग बी यांना आवडले असून त्यांनी ते सोशल मिडियावर शेयर केले आहे. याबाबत आभार मानताना बिग बी म्हणाले, ‘धन्यवाद अमूल. तुमच्या या खास पोस्टर कॅम्पेनसाठी माझी निवड केल्याबद्दल. एका साधारण व्यक्तीला तुम्ही अमूल्य केलेयं.’ 11 जुलै रोजी बिग बी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 23 दिवस नानावटीत उपचार घेतल्यानंतर रविवारी ते कोरोनाला हरवून घरी पोहोचले आहेत. त्यानंतर त्यांनी आपल्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर, नर्सेस तसेच प्रार्थना करणार्‍या लाखो चाहत्यांचे सोशल मीडियावरून आभार मानले होते.