
राज्यात दिवसभरात 10 हजार 14 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 68 हजार 435 झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.79 टक्के झाले असून आज राज्यात 11 हजार 88 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या 1 लाख 48 हजार 553 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
राज्यात आज 256 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर 3.42 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 28,37,578 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5,35,601 (18.87 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 10,04,233 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 35,648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत आज 917 नवे रुग्ण, 48 जणांचा मृत्यू
मुंबईत आज कोरोनाचे 917 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 48 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,154 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या आता 99 हजार 140 वर पोहोचली आहे. मुंबईत 48 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 890 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 88 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन आता 18 हजार 905 इतकी आहे.



























































