
तांबळडेग येथील वाहून गेलेला बंधारा दुरुस्त करण्यास मंजुरी देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच या ठिकाणी एक किलोमीटर लांबीचा बंधारा बांधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तांबळडेग येथील धूप होत असलेल्या किनारपट्टीची नुकतीच पालकमंत्री उदय सामंत यांनी पहाणी केली. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या.
नवीन धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक सादर करावे, अशा सूचना देत पालकमंत्री सामंत म्हणाले की, हा एक किलोमीटर लांबीचा बंधारा 5 गावांसाठी आहे. त्यामूळे त्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देऊ. स्थानिकांची अडचण होऊ नये यासाठी तात्काळ धूप प्रतिबंधक बंधारा गरजेचा आहे. या वेळी सामंत यांनी स्थानिकांच्या समस्या जाणुन घेतल्या. या पाहणीवेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, संजय पडते नागेंद्र परब, विकास कुडाळकर ,देवगड तालुका प्रमुख मिलींद साटम,विलास साळसकर, मिठबाव विभाग प्रमुख शिवदास नरे,अमोल लोके,बंडू गांवकर,महिला आघाडी प्रमुख पूर्वा सावंत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, पत्तन विभागाचे अभियंता वसावे, देवगड तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहा.गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तांबळडेगचे सरपंच जगदीश मालडकर, उपसरपंच रमाकांत सनये ग्रामसेवक लक्ष्मण घरजाळे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
































































