
देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात शनिवारी 63,489 ने वाढ झाली असून 944 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाने देशातील एकूण मृतांचा आकडा 50 हजाराच्या जवळ पोहोचला आहे.
देशात सध्या 25,89,682 कोरोनाग्रस्त असून त्यातील 6,77 444 रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. तर 18,62,258 रुग्ण बरे झाले आहेत. तर 49हजार 980 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. देशात 7 ऑगस्टपासून दररोज 60 हजारहून अधिक रुग्ण वाढत आहेत. देशात गेल्या 24 तासात 7,46,608 चाचण्या करण्यात आल्या असून एकूण 2,93,09,703 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

























































