डॅरेन सॅमीला वेध पुनरागमनाचे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीज संघाचा माजी कर्णधार डॅरेन सॅमीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचे वेध लागले आहेत. हिंदुस्थानात 2021 सालामध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडीज संघाचे प्रतिनिधित्व करायची इच्छा त्याने यावेळी बोलून दाखवली आहे. त्याआधी तो कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे.

डॅरेन सॅमी याप्रसंगी म्हणाला, मी अजून निवृत्त झालेलो नाही. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दरवाजेही मी बंद केलेले नाहीत. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये माझ्याकडून छान खेळ व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहे. तसे झाल्यास पुन्हा वेस्ट इंडीजसाठी खेळण्यासाठी सज्ज होईन, असा विश्वासही पुढे त्याने व्यक्त केला.