नवनीत राणा यांना पुन्हा कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 कोरोनाकर उपचार घेऊन घरी परतलेल्या खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी पालिका अधिकाऱयांनी त्यांची चाचणी केली असता नवनीत राणा यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनावर उपचार पूर्ण झाल्यानंतर राणा यांना रविवारी लिलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. दरम्यान, महापालिका अधिकाऱयांनी त्यांना 15 दिवसाचा होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. खासदार राणा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने मुंबईतील लिलावती रुग्णालयात हलविण्यात आले होते. अखेर 16 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.