
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व्यायामशाळा बंद करण्यात आल्या आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्याने जीम पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील जीम सुरु करण्याची मागणी काही राजकीय नेत्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यानंतर आता मुंबईतील व्यायामशाळा, हेल्थक्लब व खेळाडूच्यावतीने खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र पाठवून व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी केली आहे. या मागणीनंतर सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. व्यायामशाळाच्या चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे बंद असलेल्या जीम पुन्हा सुरू करा असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले आहे.

























































