कोरोनापासून बचावासाठी आयआयटी मुंबईचे पदवीदान ‘हाय-टेक’ पद्धतीने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटातही विद्यार्थ्यांचे शिक्षण अविरत सुरू रहावे यासाठी ऑनलाईन शिकवणीचा पर्याय सर्वप्रथम स्वीकारणाऱया पवईच्या आयआयटी मुंबईने आपला पदवीदान सोहळाही ‘हाय-टेक’ पध्दतीने साजरा करण्याचे ठरवले आहे. आयआयटीचा 58 का पदवीदान सोहळा 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. तो अद्ययावत ‘व्हर्च्युअल रिऍलिटी’ पध्दतीने केला जाणार आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित न राहताही स्वत:ला ऍनिमेटेड अवतारात पदवा स्वीकारताना ऑनलाईन पाहू शकणार आहेत. देशातील अशा पध्दतीचा हा पहिलाच पदवीदान सोहळा ठरणार आहे.

2016 चे भौतिकशास्त्राचे नोबल विजेते आणि प्रिन्सटन विद्यापीठाचे प्राध्यापक हे या पदवीदान सोहळ्याचे मुख्य अतिथी असणार आहेत. तर ब्लॅकस्टोन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन शेकरझमॅन हे या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुर्गम भागात राहणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना हा सोहळा पाहता यावा म्हणून दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

आयआयटीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सोशल मिडिया पेजेसवरही हा सोहळा थेट पाहता येणार आहे. ‘व्हर्च्युअल रिऍलिटी’ हा विद्यार्थ्यांसाठी एक वेगळाच अनुभव असणार आहे. पदवीदानावेळी प्रत्येक विद्यार्थ्याचे छायाचित्र आणि नाव प्रक्षेपित केले जाणार आहे. पदवीदानानंतर विद्यार्थी संस्थेच्या कॅम्पसची व्हर्च्युअल टूरही करू शकणार आहेत.