
हरियाणामधील सोनीपत येथे पोलिसांकडून पेटीएमच्या माध्यमातून लाच घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरामधील तृतीयपंथीयांच्या मदतीने काही पोलीस कर्मचारी पैसे कमवण्यासाठी सर्वसामान्यांना त्रास देत असल्याचे समजते. या प्रकरणामध्ये पोलीस कर्मचाऱयांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. सोनीपत येथे राहणाऱया विमल किशोर नावाच्या एका तरुणाने पोलिसांनी तृतीयपंथीयांना धक्काबुक्की केल्याच्या खोटय़ा आरोपात गुंतवूनआपल्याकडे पेटीएमवरुन दोन हजारांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भातील वृत्त एका हिंदी टीव्ही वाहिनीने दिले दिलं आहे. दुचाकीवरुन घरी जात असताना हा सर्व प्रकार घडल्याचे विमलने म्हटले आहे






















































