
दुर्दैवाने, समाजात एक असा कल तयार झाला आहे की अधिकाराच्या नावाखाली काही लोक स्वातंत्र्याचा गैरवापर करत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून देशातील नागरिक दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकत आहेत. मात्र या स्वातंत्र्याचा असा गैरफायदा कोणी घेऊ नये असे मत मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी आज व्यक्त केले
कोरोनाविरोधात लढा देणाऱया विशिष्ट समाजातील डॉक्टरांवर हल्ला करण्याबाबत चिथावणी देणारे भाषण एमआयएमचा कार्यकर्ता अबू फैजल याने फेसबुक, युटय़ूबकर अपलोड केले होते. याप्रकरणी फैजल विरोधात कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने पोलिसांना द्यावेत अशी मागणी करत इम्रान खान याने मुंबई उच्च न्यायालयात ऍड. विवेक शुक्ला यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेकर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने आज याबाबत आदेश जारी केले. हिंदुस्थानसारख्या धर्मनिरपेक्ष देशात इतर धर्माच्या लोकांसोबत शांतीने नांदता येईल असा विश्वास लोकांना वाटला पाहिजे, असे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.
























































