राज्याच्या तुरुंगांतील 848 कैदी कोरोनातून बरे; 272 कर्मचाऱ्यांचीही विषाणूवर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील 27 तुरुंगांतील कोरोनाचा रिकव्हरी रेट चांगलाच सुधारला आहे. विषाणूची लागण झालेल्या 1166 कैद्यांपैकी 848 कैदी तसेच 312 तुरुंग कर्मचाऱयांपैकी 272 जण ठणठणीत बरे झाले आहेत. महामारीत वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये आतापर्यंत 6 कैद्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्य तुरुंग प्रशासनातर्फे शुक्रकारी देण्यात आली.

नागपूर मध्यवर्ती तुरुंगात सर्वाधिक 219 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ पुण्याच्या येरवडा तुरुंगात कोरोनाचे 190 रुग्ण आढळले. तसेच मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात 182 तर सांगली तुरुंगात 145 कैद्यांना कोरोनाची लागण झाली. या कैद्यांच्या संपर्कात आलेले तुरुंग कर्मचारीही विषाणूच्या जबडय़ात सापडले. नागपुरात 62, मुंबईत 46, ठाण्यात 35, संभाजीनगरमध्ये 34, कल्याण 31 तसेच येरकडा तुरुंगात 26 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली. या आकडेवारीने सुरुवातीला गृह खात्याची चिंता वाढवली. मात्र आता 1166 कैद्यांपैकी 848 कैदी तसेच 312 तुरुंग कर्मचाऱयांपैकी 272 जण कोरोनामुक्त झाल्याने गृह खात्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याच्या तुरुंगांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर गृह खात्याने तातडीने साथरोग नियंत्रणासाठी ठोस पावले उचलली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्क तुरुंगांतील किमान 10,536 कैद्यांची पॅरोलकर सुटका करण्यात आली. त्यामुळे सध्या तुरुंगांमध्ये एकूण 26,408 कैदी आहेत.