राज्यात 14 हजार 161 नवीन कोरोना रुग्ण; 11 हजार 749 कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात 14 हजार 161 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहेत तर 11 हजार 749 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.62 टक्के झाले असून आतापर्यंत एकूण 4 लाख 70 हजार 873 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 1 लाख 564 हजार 562 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात शुक्रवारी 339 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.30 टक्के एवढा आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 34 लाख 92 हजार 966 नमुन्यांपैकी 6 लाख 57 हजार 450 नमुने पॉझिटिक्ह (18.82 टक्के) आले आहेत. राज्यात 11 लाख 92 हजार 685 लोक होम क्कारंटाईनमध्ये आहेत. सध्या 35 हजार 132 लोक संस्थात्मक क्कारंटाईनमध्ये आहेत.