धोनीला पाहिले की पतीची आठवण येते – सानिया मिर्झा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यावर हिंदुस्थानची टेनिस खेळाडू आणि पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलीकची पत्नी सानिया मिर्झा हिने प्रतिक्रिया दिली आहे. ‘स्पोर्ट्सकीडा’ला दिलेल्या मुलाखतीत सानियाने धोनीला शुभेच्छा दिल्या आणि त्याला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते असेही म्हटले.

धोनीची इच्छा असती तर तो फेअरवेल सामना खेळला असता आणि मैदानावर उतरुन कारकिर्दीला अलविदा केले असते. परंतु त्याने शांतपणे यापासून दूर जात निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. आणि हीच बाब त्याला कॅप्टन कुल बनवते, असे 33 वर्षीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा म्हणाली. तसेच त्याने स्वतःसाठीच नाही तर देशासाठीही खूप काही कमावले, असेही सानिया म्हणाली.

screenshot_2020-08-23-21-43-39-079_com-android-chrome

मुलाखतीत धोनीच्या पर्सनॅलिटीबाबत चर्चा सुरू असताना त्याला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते असे सानिया म्हणाली. धोनी आणि शोएब मलिक यांनी पर्सनॅलिटी सारखीच असल्याचे सानिया म्हणते. मैदानावर दोघेही शांत राहतात. त्यांच्यात बऱ्याच समानता आहेत, असेही सानिया म्हणाली.