पुणे – पूर्ववैमनस्यातून सख्ख्या भावडांवर टोळक्याचा खूनी हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्ववैमनस्यातून दोन सख्ख्या भावडांवर सहाजणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री पावने बाराच्या सुमारास शांताईनगर चौक पठार वस्ती वडगाव येथे घडली. विकी चावडा व बिट्या पाडळे यांच्यासह सहा जणांविरुद्ध सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल कांबळे (वय 22, रा. सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूलचा भाऊ गणेश आणि आरोपीची तीन वर्षापुर्वी भांडणे झाली होती. त्यावेळी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच कारणातून आरोपी विकी आणि बिट्या राहूल आणि गणेशवर चिडून होते. सोमवारी रात्री पावने अकराच्या सुमारास राहूल व गणेश घरी चालले होते. त्यावेळी टोळक्याने त्यांना रस्त्यात गाठून शिवीगाळ केली. आता तुम्हा संपवूनच टाकतो म्हणत टोळक्याने त्यांना लाथाबुक्यांसह बांबूने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुहे राहूल व गणेश पळून जात असताना टोळक्यातील एकाने दोघांना मारून टाका असे म्हणत हातातील कोयता फेकून मारला. आरोपीच्या शोधासाठी सिंहगड रोड पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक के. एस. तनपुरे करीत आहेत.