
कोरोनाच्या संकटात मालवाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी सार्वजनिक व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना सहा महिन्यांची वाहन कर माफी देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 700 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मात्र या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 11 लाखांहून अधिक वाहनांना होईल.
‘या’ वाहनांसाठी राहणार करमाफी
राज्यामध्ये वार्षिक करप्रणालीच्या वाहनांना 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2020 या सहा महिन्यांच्या कालावधीत कर भरण्यापासून 100 टक्के करमाफी देण्याचा म्हणजे सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या 50 टक्के करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.



























































