
देशात गुरुवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ झाली. 24 तासांत 75,760 नवीन रुग्ण आढळले, तर 1023 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. याचवेळी कोरोनातून बरे झालेल्या लोकांची संख्या 25 लाख 23 हजार 772 वर पोहोचल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 33 लाख 10 हजार 235 झाली आहे. यात 7 लाख 25 हजार 991 इतकेच ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच कोरोनाबळींची एकूण संख्या 60,472 झाली आहे. कोरोनाचे वेळीच निदान करण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. बुधवारी तब्बल 9 लाख 24 हजार 998 नमुने तपासण्यात आले. देशात बुधवारपर्यंत एकूण 3 कोटी 85 लाख 76 हजार 510 चाचण्या करण्यात प्रशासनाला यश आले.




























































