
राज्यातील व्यायामशाळा सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. पण व्यायामशाळांमधून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून जीम चालकांनी सरकारला मार्गदर्शक तत्वे सादर करावीत. त्याआधारे व्यायामशाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले.
मुंबईतील व्यायामशाळांच्या चालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सर्व जिमचालकांनी एकत्र येऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गदर्शक तत्वे ठरविणे आवश्यक आहेत. ही तत्वे राज्यातील जिम चालकांनी एकत्रितपणे ठरवून सरकारला सादर केल्यास त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल.

























































