
देशात सर्वाधिक लोकप्रिय असणारे फेसबुक भाजप व आरएसएसच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यापाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘टाईम’ मासिकाचा अहवाल देत हिंदुस्थानात व्हॉट्सऍप आणि भाजपचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अमेरिका की टाइम मैगज़ीन ने WhatsApp-BJP की साँठ-गाँठ का खुलासा किया:
40 करोड़ भारतीय WhatsApp इस्तेमाल करते हैं और अब WhatsApp चाहता है कि उससे पैसों का भुगतान भी किया जाए। इसके लिए मोदी सरकार की स्वीकृति की ज़रूरत है।
इसलिए, BJP की WhatsApp पर पकड़ है।https://t.co/ahkBD2o1WI
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 29, 2020
अमेरिकेतील ‘टाइम’ मासिकात प्रसिद्ध झालेला एक लेख राहुल गांधी यांनी ट्विट करत भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. हिंदुस्थानातील 40 कोटी लोक वापरत असलेल्या या ऍपचा ऑनलाइन व्यवहारांसाठी कापर करण्याची व्हॉट्सऍपची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना मोदी सरकारची परवानगी आवश्यक आहे. व्हॉट्सऍप आणि भाजपचे साटेलोटे असल्याचे यात स्पष्टपणे दिसून येत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
यापूर्वी फेसबुकच्या निष्पक्षतेवर निर्माण झाले होते प्रश्नचिन्ह
यापूर्वी ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने एक अहवाल प्रसिद्ध करत व्हॉट्सऍपची मालकी असलेल्या फेसबुकच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामध्ये फेसबुक सत्ताधारी भाजपला अनुकूल भूमिका घेत आहे. तसेच भाजप नेत्यांच्या ‘हेट स्पीच’ पोस्टविरोधात कारवाई करण्यास जाणूनबुजून कुचराई करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. हिंदुस्थानात फेसबुक पूर्णपणे भाजप आणि आरएसएसच्या नियंत्रणात काम करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
नोटाबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त!
नोटबंदी, जीसएसटीचा निर्णय आाणि फसलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालीय, अशा शब्दांत कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे देश आर्थिक संकटात आल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
India’s economy has been destroyed by three actions:
1. Demonetisation
2. Flawed GST
3. Failed lockdownAnything else is a lie.https://t.co/IOVPDAG2cv
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 28, 2020
कोरोना साथीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाची ही आपत्ती ‘ऍक्ट ऑफ गॉड’ असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पाकणार असल्याचे सीतारामन यांनी म्हटले होते. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी ट्विट करत जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नोटाबंदी, दोषयुक्त जीएसटी प्रक्रिया आणि फसलेले लॉकडाऊन या तीन टप्प्यांचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालाय. याव्यतिरिक्त सांगण्यात येणाऱया इतर गोष्टी खोटय़ा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
























































