बँकिंग सेक्टरमध्ये `कहीं खूशी, कहीं गम’, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटात तात्पुरता दिलासा देणाऱ्या काही बँकांनी आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचे पाऊल टाकले आहे. काही बँकांनी कर्ज स्वस्त केल्याची खूशखबर दिली, तर काही बँकांनी कर्ज महाग केले आहे. तसेच कर्ज घेण्याची प्रक्रिया काही ठिकाणी सोपी तर काही ठिकाणी किचकट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात बँक ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना ‘कहीं खूशी, कहीं गम’ असा अनुभव येणार आहे.

बँक ऑफ बडोदाने नवीन ग्राहकांसाठी कर्जावर रिस्क प्रिमियम वाढवला आहे. त्यामुळे या बँकेतून कर्ज घेणे महाग झाले आहे. चांगला क्रेडिट स्कोअर असणाNया ग्राहकांनाच कमी व्याजदराने कर्ज मिळणार आहे. कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांना खूशखबर देताना ‘कार्डलेस कॅश’ची सुविधा उपलब्ध केली आहे. ग्राहकांना डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. यासाठी नेटबँकींगच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यावेळी एक कोड जनरेट होईल. त्याआधारे एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

दुसरीकडे, एचडीएफसी बँकेने विशिष्ट कालावधीच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील (एफडी) व्याजदरात अर्धा टक्क्यापर्यंत घट केली आहे. बँकेचे नवीन व्याजदर 25 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. 91 दिवसांपासून सहा महिन्यांपर्यंतच्या डिपॉझिटवरील व्याजदरात बँकेने सर्वात मोठी कपात केली आहे.

आयसीआयसीआय बँक सॅटेलाइटची मदत घेणार
आयसीआयसीआय बँकेने शेतकNयांना कर्ज देताना अनोखे पाऊल उचलले आहे. संबंधित शेतकNयाच्या शेतीची सॅटेलाइट छायाचित्रे तपासली जाणार असून त्याआधारे त्या शेतकNयाला किती कर्ज द्यायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सॅटेलाइटच्या मदतीमुळे शेतकNयाच्या आर्थिक स्थितीचा अंदाज लावणे सोपे ठरेल तसेच कर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रियेला कमी वेळ लागेल, असे बँकेचे म्हणणे आहे.