
गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने राक्षसभुवन येथील गावकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन शनिवार दि.29 रोजी सकाळी दहाच्या सुमारास वाळुने भरलेले चार टिप्पर व दोन ट्रक अडवून या घटनेची माहिती चकलंबा पोलीस ठाण्यास कळविली. या अवैध वाळू उपसा प्रकरणी गोदाकाठील गावकरी सतर्क झाल्याने वाळु माफियांचे धाबे दणाणले आहेत.
गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने वाळूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करण्याचा सपाटा सुरू ठेवला होता. रात्रंदिवस सुरू असलेल्या वाळू उपायांमुळे गावकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली होती. या होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे गावकऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण झाला होता. या संदर्भात तालुक्यातील हिंगणगाव व संगम जवळगाव या ठिकाणाहून जिल्हा पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. परंतु गेवराई महसूल प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करीत होते. रात्रंदिवस सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे गोदापात्राच्या रस्त्याची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे शनिवार दि.29 रोजी राक्षसभुवन गावकऱ्यांनी स्वत: पुढाकार घेऊन वाळूने भरलेले चार टिप्पर व दोन ट्रक अडवून चकलंबा पोलीसांच्या हवाली केले. गावकरी सतर्क झाल्याने या प्रकारामुळे वाळू माफियांचे चांगले धाबे दणाणले आहेत.





























































