श्रीनगरमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

जम्मू कश्मीरच्या श्रीनगरमधील पांथा चौक येथे दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. ही चकमक अद्याप सुरू असून आणखी दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या 24 तासातले ही कश्मीर खोऱ्यातील दुसरी चकमक आहे.

पांथा चौक भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय राखील पोलीस दलाने डोबे मोहल्ला या भागात शोध मोहिम सुरू केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर सुरू झालेल्या चकमकीत आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एक जवान शहीद झाले.

शनिवारी पहाटे पुलवामा येथे झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता तर एक जवान शहीद झाला होता.