धाराशिव जिल्ह्यात 204 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण वाढले, 4 रुग्णांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धाराशिव जिल्ह्यात आज बुधवारी 204 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 189 रुग्ण उपचारानंतर घरी गेले असून जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 6 हजार 118 झाली आहे. 2 हजार 67 रुग्णावर विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच आज 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून दगावलेल्या रुग्णांचा आकडा 165 झाला आहे.

धाराशिव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रातील कोरोना तपासणी प्रयोगशाळेत संशयीत रुग्णांचे 386 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यासर्व स्वॅबचा तपासणी अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला आहे. यामध्ये 256 निगेटीव्ह, 109 पॉझिटीव्ह, 21 अहवाल अनिर्णित आहेत. तसेच 605 अँटीजेन किट टेस्टींगमध्ये 81 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तसेच धाराशिव जिह्यातील बाहेर जिह्यात 14 पॉझिटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 204 झाली आहे. पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये धाराशिव तालुक्यात 72, तुळजापूर 32, उमरगा 28, कळंब 41, परंडा 15, लोहारा 6, भूम  8 तर वाशी तालुक्यात 2 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा 6 हजार 118 झाला आहे. 3 हजार 886 कोरोना रुग्ण उपचारानंतर घरी गेले असून 2 हजार 67 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात 4 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील कोरोनाबाधीत मृताचा आकडा 165 झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर वाढत असून सध्याचा मृत्यूदर 2.70 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 704 व्यक्ती होम क्वारंटाईन असून 836 व्यक्ती इंटय़ीस्टुशनल क्वारंटाईन आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत 37 हजार 740 तपासण्या करण्यात आल्या असून यापैकी 6 हजार 168 नमूणे पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. याचे प्रमाण 16.21 टक्के आहे.