
स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबईकरांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा शिवसेनेच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार विभाग क्र.2, शिवसेना शाखा क्र 24 च्या वतीने विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना युवा सेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, विभाग संघटक मनाली चौकीदार यांनी कोरोना योद्ध्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी डॉ. उल्का घाटकर, ङीमेलो व घरोघरी जाऊन तपासणी करणाऱ्या 35 आरोग्य सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभा संघटक नंदू मोरे उपविभागप्रमुख, नगरसेवक शंकर हुंडारे, उपविभागप्रमुख रवींद्र वेदपाक व आयोजक शाखाप्रमुख कमलेश कदम आणि शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



























































