
लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता उद्रेक थांबण्याची चिन्हे दिसून येत नाही. आज तब्बल 274 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून उपचारादरम्यान आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8701 वर जाऊन पोहोचली आहे.
आज 274 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 8701 झाली आहे. उपचारदरम्यान आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले असून कोरोनामुळे आजपर्यंत जिल्ह्यात 296 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज 164 रुग्ण उपचाराने बरे झाले आहेत तर आज पर्यंत सहा हजार 442 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. लातूर जिल्ह्यातील रुग्णालयात सध्या 1963 रुग्ण उपचार घेत आहेत. लातूर जिल्ह्यातील वाढत जाणारी कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वांची चिंता वाढवत आहे.


























































