हिजबुलचा उत्तर कश्मीरात पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न, तळ उभारण्याचा डाव हाणून पाडणार – लष्कर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिजबुल मुजाहिद्दीनने उत्तर कश्मीरात पुन्हा तळ उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र सुरक्षा दले सतर्क आहेत. हिजबुलचा डाव वेळीच हाणून पाडू, असा इशारा शनिवारी लष्कराने दिला. एक दिवसापूर्वीच बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी हिजबुलच्या तीन दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले. त्या कारवाईची माहिती उत्तर कश्मीर रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक मोहम्मद सुलेमान चौधरी यांनी पत्रकारांना दिली.

यावेळी लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या कमांडर सेक्टर-10चे ब्रिगेडियर एन. के. मिश्रा हे उपस्थित होते. उत्तर कश्मीरात दीर्घ काळानंतर हिजबुलच्या दहशतवाद्यांना मारले. अलिकडच्या वर्षांत या परिसरात केवळ लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ठार केले आहे, असे चौधरी यांनी सांगितले.