
सायकल प्युअर अगरबत्तीजचे निर्माते आणि अगरबत्तींचे जगातील सर्वात मोठे उत्पादक एन. रंगराव अँड सन्स (एनआरआरएस) यांनी ”हीलिंग टच” या नावाने आयुष प्रमाणित वैयक्तिक व गृहस्वच्छतेसाठीच्या उत्पादनांची नवीन रेंज बाजारात दाखल केली आहे. या मालिकेत आयुर्वेदिक फॉर्म्युल्यावर आधारित हँड सॅनिटायझर, व्हेजिटेबल अँड फ्रुट वॉश व विविध पृष्ठभागांच्या निर्जंतुकीकरणासाठीचा स्प्रे यांचा समावेश आहे. या उत्पादकांना आयुष मंत्रालयाची मान्यता आहे आणि जंतू व जीवाणूंपासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने त्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
या स्वदेशी ब्रँडने आरोग्यदायी जीवनपद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ग्राहकांची घरे आणि सार्वजनिक ठिकाणे सुरक्षित बनविण्यासाठी निर्माण केलेल्या या उत्पादनांसाठी स्वमालकीच्या आयुर्वेदिक फॉर्म्युल्याचा वापर केला आहे.
याप्रसंगी बोलताना रिपल फ्रॅग्रन्सेसचे व्यवस्थापकीय किरण रंगा म्हणाले, ”आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी ही पहिली पायरी आहे असे आम्ही मानतो. आपल्या शहरांतील गर्दी अधिकाधिक वाढत जात असताना खासगी आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या सवयींचा अंगिकार करून जगणे आपण शिकायला हवे. विविध ठिकाणी असणाऱ्या जंतू आणि रोगकारकांपासून आपली वैयक्तिक स्वच्छता व सुरक्षितता जपण्यासाठी झटपट आणि सोयीचा मार्ग उपलब्ध करून देणे हा ‘हीलिंग टच’चा हेतू आहे.”
हीलिंग टच हँड सॅनिटायझर
क जीवनसत्त्वाने समृद्ध लिंबावर आधारित हँड सॅनिटायझर हे दैनंदिन आयुष्यात ग्राहकांना स्वच्छता आणि सुरक्षिततेची हमी देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या आयुष मान्यताप्राप्त हँड सॅनिटायझरमध्ये ७० टक्के अल्कोहोलच्या साथीने जंतूनाशक घटकही आहेत. ग्राहकांना दर्जा व उपलब्धतेची हमी देणारे हे सॅनिटायझर एफएसएसएआय आणि आयुषच्या मार्गदर्शक सूचनांबरहुकुम बनविण्यात आले आहे. बाजारात हे उत्पादन जेल आणि लिक्विड अशा दोन प्रकारांत तसेच जेल फॉर्म्युलासाठी 100 मिली व 250 मिली तर लिक्विड सॅनिटायझरसाठी 500 मिलीच्या बाटलीमध्ये उपलब्ध आहे.
हीलिंग टच मल्टि-फंक्शनिंग डिसइन्फेक्टन्ट स्प्रे
विविध पृष्ठभागांसाठीचा हा जंतूनाशक स्प्रे कोणत्याही पृष्ठभागाची झळाळी न घालवता, त्यावरील 99.9 टक्के जंतू व जीवाणूंचा नायनाट करण्यासाठी तयार करून या पृष्ठभागांना स्वच्छ व चमकदार बनविण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
‘हीलिंग टच’ उत्पादने ही सोय आणि सुरक्षितता ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विचारपूर्वक बनविण्यात आली असून ती सर्व रिटेल आउटलेट्स, हायपरमार्केट्स, सुपरमार्केट्स आणि www.cycle.in या संकेतस्थळावर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
























































