
नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) – ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या (एनएसडी) अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही निवड चार वर्षांसाठी आहे. या निवडीबद्दल परेश रावल यांनी आनंद व्यक्त केला असून ‘हे काम माझ्यासाठी आव्हानात्मक पण मजेशीर असेल. या क्षेत्राची चांगली माहिती असल्यामुळे अध्यक्ष म्हणून सर्वोत्तम द्यायचा माझा प्रयत्न असेल’, अशी प्रतिक्रिया रावल यांनी दिेली.
65 वर्षीय परेल रावल यांनी सिनेमा आणि नाटक या दोन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी ‘होली’ सिनेमातून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. सिनेमांमध्ये खलनायक असो कॉमेडीयन, रावल यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या याच कामगिरीसाठी त्यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले आहे.

























































