
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात लवकरच आणखी दोन 64 मीटर उंचीच्या अत्याधुनिक उत्तुंग शिड्या आणल्या जाणार आहेत. यामुळे पालिकेला बचावकार्यात मोठी मदत होणार असल्याने जीवित-वित्तहानी टळण्यास मदत होणार आहे. या उत्तुंग शिडीमुळे तब्बल 22 व्या मजल्यापर्यंत बचावकार्य करता येणार आहे. पालिकेचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी ही माहिती दिली.
झपाट्याने विकसित होणाNया मुंबईत जागेचा प्रश्न गंभीर असल्याने उत्तुंग इमारती उभारल्या जात आहेत. दिवसेंदिवस या उत्तुंग इमारतींची संख्या वाढतच आहे. असे असताना या उत्तुंग इमारतींच्या अग्निसुरक्षेचा प्रश्नही महत्त्वपूर्ण ठरत आहे. यामुळे पालिकेच्या अग्निशमन दलात बचावकार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणली जात आहे. यामध्ये याआधी तब्बल90 मीटर उंचीची शिडी अग्निशमन दलात दाखल झाली आहे. या शिडीने 30 व्या मजल्यापर्यंत बचावकार्य करता येत आहे. अशा विविध उंचीच्या 18 शिड्या अग्निशमन दलाच्या ताफ्यात आहेत. यामध्ये पालिकेच्या अग्निशमन दलाचे मजबुतीकरण करण्यासाठी ६४ मीटर उंचीच्या आणखी दोन शिड्या आणल्या जाणार आहेत. यासाठी पालिका सुमारे एक कोटीचा खर्च करणार आहे. या उत्तुंग शिड्यांचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने निविदाही मागवल्या आहेत. त्यामुळे लवकरच त्या अग्निशमन दलात दाखल होतील.
असा होणार फायदा
उत्तुंग इमारतीत दुर्दैवाने आग लागल्याची दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याचा धोका जास्त संभवतो. अशा वेळी इमारतीच्या टेरेसवर लोक जमा झाल्यास त्यांना उंच शिडीच्या माध्यमातून खाली सुरक्षित आणणे शक्य होते. गेल्या वर्षी वांद्रे एमटीएनएल कार्यालयाला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाने अशा शिडीच्या माध्यमातून शेकडो कर्मचाNयांना वाचवले होते. शिवाय अनेक वेळा शिडीच्या माध्यमातून अग्निशमन दलाने अनेकांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे उत्तुंग शिड्यांचा बचावकार्यात मोठा उपयोग होणार






















































