
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे 152 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 6297 झाली आहे.गेल्या आठवडाभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत़. आज आलेल्या अहवालानुसार 152 जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला़. आज रत्नागिरीतील एका महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ कोरोनाच्या बळींची संख्या आता 187 वर पोहोचली आहे़. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित क्षेत्रांची संख्या झपाट्याने वाढत आहे़.



























































