
ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रिकेट समालोचक डीन जोन्स (Dean Jones) यांचे निधन झाले. मुंबईत वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.
यूएईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) साठी डीन जोन्स (Dean Jones) मुंबईतून समालोचन करता होते.सोशल मीडियावरही ते चांगलेच सक्रिय होते. गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने याबाबत माहिती दिली आहे.
Former Australian cricketer and commentator Dean Jones passes away at 59: Star India
(Pic courtesy: Dean Jones Twitter) pic.twitter.com/T4c7woh44x
— ANI (@ANI) September 24, 2020
डीन जोन्स (Dean Jones) यांची गणना ऑस्ट्रेलियाच्या महान खेळाडू आणि क्षेत्ररक्षकात होते. ऑस्ट्रेलियाकडून त्यांनी 52 कसोटी आणि 164 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत 216 आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये 145 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

कसोटीत त्यांनी 46.55 च्या सरासरीने 3,631 धावा ठोकल्या आहेत. यात 11 शतक आणि 14 अर्धशतक यांचा समावेश आहे. तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 44.61 च्या दमदार सरासरीने 6,068 धावा केल्या असून यात त्यांच्या 7 शतकांचा आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. यासह कसोटीत 34 आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये 54 कॅच त्यांनी घेतले. तसेच प्रथमश्रेणीच्या 245 लढतीत 19,188 धावा केल्या असून 334 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

























































