
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ति पक्ष बिहार निवडणुकीतील जागा वाटपावरून नाराज आहे. त्यामुळे लोजप लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यात एकूण 243 जागा आहे. त्यापैकी 143 जागांवर निवडणूक लढण्याची तयारी लोजप करत आहे.
एनडीए सोबत रहायचे की नाही याचा निर्णय पुढील दोन दिवसांत घेतला जाईल. बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी नामांकन भरण्याची तारीख एक ऑक्टोबर आहे.
एनडीचे तीन प्रमुख पक्ष भाजप, जदयू आणि लोजप आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप नेत्यांनी जागा वाटपावर बोलणे टाळले आहे. असे असले तरी पासवान यांच्या पक्षाला 27 जागांची ऑफर देण्यात आली आहे.
लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांना भाजपशी काही तक्रार नाही. त्यांचे जदयूशी मतभेद आहेत. उद्या लोजप जर स्वबळावर निवडणूक लढवली तर ते भाजप विरोधात उमेदवार देणार नाहीत. असे असले तरी भाजपने चिराग पासवान यांची समजूत घालण्यासाठी विधान परिषदेच्या काही जागा देऊ केल्या आहेत.
या सगळ्यात रामविलास पासवान हे रुग्णालयात दाखल असल्याने आणखीन अडचणीत भर पडली आहे. जर पासवान असते तर सर्व पक्षीयांना मंजूर होईल अशी जागावाटप झाली असती.



























































