
चीनची स्मार्टफोन कंपनी ओप्पो (Oppo) ने आपला नवीन फोन ‘Oppo A93’ व्हिएतनाममध्ये लॉन्च केला आहे. हिंदुस्थानमध्ये गेल्या महिन्यात लॉन्च केलेल्या F17 प्रो याचाच हा फॉरमॅट आहे. काळ्या आणि पांढऱ्या रंगात हा फोन उपलब्ध आहे. या फोनला 8 जीबी रॅम +128 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे.
वैशिष्ट्य –
– फोनला 6.43 इंचाचा फुल HD प्लस सुपर AMOLED डिस्प्ल देण्यात आला आहे.
– इंट्रीगेट्रेड फिंगरप्रिंट सेंसर
– काळ्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध
– फोनला 48 मॅगपिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर आणि 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत.
– सेल्फी साठी ड्युअल लेन्स कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 16 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आलाय.

– 4000mAh ची दमदार बॅटरी
– तसेच फोनसोबत Wi-Fi 802.11 a/b/g/n, GPS, Bluetooth v5.10, USB OTG, USB Type-C, 3G आणि 4G असे फीचर्स देण्यात आलेय.
किंमत –
दोन रंगात उपलब्ध असणाऱ्या या फोनची किंमत 324 डॉलर (23,700 रुपये) ठेवण्यात आली आहे.




























































