ऋतुमान – शरदाचं आनंदपर्व…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

शरद म्हणजे पारिजातक, कमळ आणि कुमुदिनीच्या उमलण्याचा मोसम, शरद म्हणजे जागृती, वैभव, उल्हास आणि आनंदाचा मोसम, स्वच्छतेची मुक्त उधळण, तुलसीदासदेखील शरद ऋतूत मग्न आहेत. ‘वर्षा विगत शरद रितु आई, देखहू लक्ष्मण परम सुहाई!’

पारिजातक फुलायला लागलाय. त्याची झडलेली फुलं शरद ऋतूच्या येण्याची बातमी देत आहेत. तसं पाहिलं तर पारिजातक मोठा लाजाळू असतो. रात्री गुपचूप उमलतो आणि उमलताच झडायला लागतो. रस्त्यावर पारिजातकाची लाल देठं असलेली, झडलेल्या फुलांची चादर सकाळी फिरण्याच्या माझ्या आनंदाला उधाण आणते. वसंताचे जे नाते मोगऱयाशी आहे तेच नातं परिजातकाचं शरदशी आहे. शरद म्हणजे पारिजातक, कमळ आणि कुमुदिनीच्या उमलण्याचा मोसम, शरद म्हणजे जागृती, वैभव, उल्हास आणि आनंदाचा मोसम, स्वच्छतेची मुक्त उधळण, तुलसीदासदेखील शरद ऋतूत मग्न आहेत. ‘वर्षा विगत शरद रितु आई, देखहू लक्ष्मण परम सुहाई !’ पारिजातकाची लाजाळू फुले दवंडी पिटतात की पितृपक्षानंतर सणांची साखळी सुरू होईल. कारण शरद उत्सवप्रिय आहे. या एका ऋतूत जेवढे उत्सव असतात तेवढे पूर्ण वर्षात नसतात. उत्सव कोणत्याही समाजाची जिवंत परंपरा असते. उत्सवांच्या माध्यमातून आपण गतकाळापासून ताकद, ऊर्जा घेत असतो, जीवनात नव्या रसाचा संचार होतो. मला वाटते की शरद आपली जिजीविषा, आपला संघर्ष व आपल्या सामूहिकतेचे प्रतीक आहे. तुलसीदासाद्वारे सुरू केलेली रामलीला असो किंवा टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव असो किंवा दुर्गापूजा, तिघांची सामूहिकता शरदाच्या सामाजिक एकजूटतेमध्ये दिसते. हे सर्व सण सामूहिकता आणि नवीन पीक उगवण्यापासून ते कापणीपर्यंतचे सण आहेत. शरद जुन्याला विसर्जित करून नव्याला पुजण्याचा उपक्रम आहे.

शरद आपल्या जिजीविशेचे प्रतीक आहे. तेव्हाच तर ऋतूंचा राजा वसंत आहे; परंतु दीर्घायुष्याची कामना करताना आपल्या पूर्वजांनी शंभर वसंत नाही, तर शंभर शरद मागितले आहेत. ‘पूर्ण वाङ्मय शंभर शरदांची गोष्ट करतो ः जीवेत् शरदः शतम्’ म्हटले आहे. कर्म करीत शंभर शरद जीवित राहावे,’ जीवनात राग, रस-रंगाचे प्रतीक वसंत आहे, पण त्याच्या संघर्षाचे प्रती तर शरदच आहे. पूर्ण वर्षात केवळ एकाच दिवशी शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा करांचा असतो. असे म्हणतात की त्या दिवशी चंद्रातून अमृताचा वर्षाव होतो म्हणून शरद अमरत्वाचे प्रतीकदेखील आहे. याला कोजागिरी पौर्णिमादेखील म्हणतात.
वसंत आणि शरद दोन्ही संधी ऋतू आहेत. एकात थंडी येत असते आणि दुसऱयात जात असते म्हणून दोघांचे चरित्र एकसारखे आहे. वसंत शिशिराच्या शर्वरीपासून मुक्तीची अनुभूती, तर शरद पावसाच्या अस्वच्छपणापासून मुक्तीचा उल्हास आहे. शरदात चातुर्मासाची समाप्ती होते. साधुसंत या चातुर्मासात एका ठिकाणी थांबलेले असतात. त्यांचे कार्यक्रम / घडामोडी थांबलेल्या असतात त्या शरदात पुन्हा सक्रिय होतात. शास्त्रीय संगीतातदेखील शारदाला सर्वात कोमल ऋतू मानले गेले आहे. आपल्या येथे प्रत्येक ऋतूचा वेगळा राग आहे. शरदात मालकंस गातात. पाच सुरामध्ये गायला जाणारा हा शास्त्र्ााrय संगीतातील सर्वात कोमल राग आहे. महाकवी निरालाने स्वतःची मुलगी सरोजच्या कैशौऱयाची तुलना मालकंसाशी केली आहे. ‘काप कोमलता पर सस्वर ज्यो मालकंस नावविना पर!’

वसंतात मौज, मस्ती, रंग, क्रीडा, उन्माद आहे. शरदात गांभीर्य, गती, घाण धुण्याची प्रबळ इच्छा आहे. वसंताच्या मुळात वासना आहे. शरदाच्या मुळात उपासना आहे. वसंत रतीच्या मदनाशी जोडतो. शरदाचा संबंध शक्तीशी, रामाशी आहे,’ वसंतात मदन व शरदात रावण भस्म झाला होता. शरदात भगवान कृष्णाने वृंदावनात सोळा हजार गोपिकाबरोबर महारास रचला होता. या रासाची विशेषता ही होती की, प्रत्येक गोपिकाला अनुभूती होती की कृष्ण तिच्याबरोबर नृत्य करत आहे. या रासात गवळी-बाल, देवीदेवता सर्व एका रासात होते आणि निसर्ग, मनुष्य, जड चेतन सर्व एक प्राण होते, संस्कृतचे कवीदेखील शारदापासून प्रभावित आहेत. कदाचित म्हणून त्यांनी साहित्यात वसंताची उपेक्षा केली आहे. त्यांच्या बहुतांशी कविता पाऊस आणि शरदावर केंद्रित आहेत. ‘मृच्छकटिक’पासून ते ‘ऋतुसंहार’पर्यंत आणि ‘गीत-गोविंद’ पासून ते ‘तुलसीदास’पर्यंत शरदाच्या लालित्याचे वर्णन प्रत्येक ठिकाणी आहे. कोणे एकेकाळी शरदाच्या शेवटाने वर्ष पूर्ण होत असे म्हणून वर्षाला शरदाने मोजले जात होते. नंतर शेतीप्रधान देशात पाऊस सुरू व्हायला लागला. विक्रम संवतची सुरुवात कालांतराने चैत्रापासून झाली. ऋतूंमध्ये शरद हा समाजवादी ऋतू आहे. त्याला ना उन्हाच्या उष्णतेपासून वाचण्यापासून एसी ना थंडीपासून बचाव करण्यासाठी उपकरणे पाहिजे. मान्सून वारे जेव्हा परत जातात तेव्हा उत्तर-पश्चिम भागाच्या तापमानात शिघ्रतेने घट येते. मोसम आल्हाददायक असतो. तुलसीदास लिहितात, ‘शरदाच्या आल्हाददायक ऋतूत राजा, तपस्वी, व्यापारी, भिकारी सर्व आनंदित होऊन नगरात विहार करतात. कोणत्याही एका ऋतूत सर्व देवतांनी मग्न होण्याची स्थिती अजून कोठे बनत नाही जसे शरदाचा सुरुवातीला शिवाची आराधना, भाद्रपदात कृष्ण जन्म, गणपती उत्सव मग आश्विनात पितरांची आठवण, शक्तिपूजेबरोबर रामाचा रावणावर विजय. एकाचवेळी सर्व देवतांची सक्रियता आणि प्रसन्नता आपल्याला शरदात दृष्टीस पडते.

z [email protected]