
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शनिवारी महाआघाडीचे जागावाटपावर एकमत झाले आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत आरजेडी 144 तर काँग्रेस 44 जागांवर लढणार असल्याचे वृत्त आहे. तर सीपीआयच्या खात्यात 6 जागा गेल्या असून सीपीआयएम 4 आणि सीपीआयएमएल 19 जागांवर लढणार आहे. तसेच पुढील दोन दिवसात व्हीआयपी आज जेएमएम यांच्या जागांवर एकमत होऊन आरजेडी याची घोषणा करेल असेही वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होईल, तर 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात 71, दुसऱ्या टप्प्यात 94 आणि तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी मतदान होईल. 10 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल.



























































